बीड

जिल्ह्यातील सर्व बँका 31 तारखेपासून पूर्ण वेळ राहणार चालू,जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश, बँकेचे व्यवहार सुरळीत करण्याची खा. प्रीतमताई मुंडेंनी केली होती मागणी

बीड, उपरोक्त विषयी संदर्भ क्र .1 च्या आदेशान्वये कोव्हीड -19 चे वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता दि .25.05.2021 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजेपासून ते 31.05.2021 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजेपर्यंत निबंध लागू केले आहेत . संदर्भ क्र .3 अन्वये आपण खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकर्सना त्यांच्या नियमीत ठरलेल्या वेळेत काम करण्याचे आदेश होणेस विनंती केली आहे . त्याअनुषंगाने कळविण्यात येते की , संदर्भ क्र .3 च्या विनंती च्या अनुषंगाने खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज दि .31.05.2021 पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे पूर्णवेळ सूरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे . सदरील परवानगी बाबत आपण आपल्या स्तवरावरुन जिल्ह्यातील सर्व बँकाना अवगत करावे . सदरील परवानगी कोव्हीड -19 चे सर्व नियम पाळण्याच्या अटीस अधिन राहून देण्यात येत आहेत, दरम्यान तोंडावर आलेला खरीप आणि शेतकऱ्यांसाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन खा. प्रीतमताई मुंडे यांनी बँकेचा व्यवहार सुरळीत करावा अशी मागणी जिल्हाधिकार्यनकडे केली होती, त्यांच्या त्या मागणीला यश आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!