बीजि
बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी जिल्ह्यात लोकांची तारांबळ होत असतांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांच्या समवेत जिल्हा कृतीदल समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये ही तारांबळ दूर झाली आहे. शासकीय रुग्णालयाप्रमाणेच आता खासगी रुग्णालयातही लसीकरण कार्यक्रम करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून बीड जिल्ह्यातील 13 रुग्णालयांना लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशभरात मिशन मोडवर लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत असून कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसी बरोबरच रशियाची स्पुतनीक ही लस ही उपलब्ध होवू लागली आहे. विशेष म्हणे रशियाच्या या लसीची भारतातच निर्मिती होणार आहे. गेल्या काही दिवसात लसीकरणामध्ये झालेला गोंधळ आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली तारांबळ लक्षात घेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोव्हीड 19 या महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. कोव्हीड आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून खासगी कोव्हीड लसीकरण केंद्रांना मान्यता देण्याची बाब विचाराधिन होती. त्याअनुषंगाने खासगी कोव्हीड लसीकरण केंद्रांना लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय कृतीदल समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
या खासगी कोव्हीड लसीकरण केंद्रावर
होणार लसीकरण
चिरंजीव बाल रुग्णालय, आदित्य आर्युेवद महाविद्यालय, तिडके हॉस्पीटल,
तिरुपती हॉस्पीटल, साईबाबा हॉस्पीटल, श्री.नारायणी चाईल्ड केअर युनिट, कट्टे आर्थोपेडिक हॉस्पीटल, लोट्स स्पेशिलिटी हॉस्पीटल, श्रीनाथ हॉस्पीटल, हे बीड मधील तर अनन्या हॉस्पीटल परळी, श्रद्धा हॉस्पीटल पाटोदा, रुक्मीनी बाल रुग्णालय धारुर, आणि पवार हॉस्पीटल माजलगाव या रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्याची सोय झाली आहे.