बीड

आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना बुकिंग न करता मिळणार लस, केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकऱण मोहिम सुरु आहे. यासाठी कोविन ऍप असून त्यावर नोंदणी करून लस घेता येते. सुरुवातीला सुरळीत सुरु असणारे पोर्टल जेव्हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केल्यानंतर मात्र डाऊन झाले. त्यानंतर बुकींग करणं, स्लॉट ठरवणं यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. आता सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोणत्याही पूर्व नोंदणीशिवाय सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. मात्र रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर लस मिळू शकते. तसंच रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लस दिली जाईल. ऑनलाइन अपॉइंटमेंट दरम्यान अनेक ठिकाणी लस वाया गेल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयाने असंही स्पष्ट केलं आहे की, ही सुविधा सध्या फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच उपलब्ध असेल. आतापर्यंत लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील लोकांनाच अपॉइंटमेंटशिवाय लस दिली जात होती. तर 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन स्लॉट बुकिंग करावं लागत होतं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!