बीड, दि. 23 : कोविड -१ ९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १ ९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे • उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती.वै.म.व रु अंबाजोगाई येथे १३०० , जिल्हा रुग्णालय बीड १३०० , उपजिल्हा रुग्णालय गेवराई , परळी , केज येथे प्रत्येकी ८०० , ग्रामीण रुग्णालय माजलगाव , धारुर , पाटोदा , आष्टी येथे प्रत्येकी ५५० , ग्रामीण रुग्णालय तालखेड , चिंचवण , धानोरा , नांदुरघाट , रायमोहा स्त्री रुग्णालय नेकनुर येथे प्रत्येकी ४०० , प्रा.आ.केंद्र ग्रामीण , नागरी रुग्णालये , पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी ३२० या प्रमाणे उपलब्ध २७८४० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्हयात वितरण करण्यात आले आहे . • दि .२४ / ५ / २०२१ रोजी सर्व प्रा.आ.केंद्र , नागरी रुग्णालये , पोलीस हॉस्पीटल , ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय बीड , स्वा.रा.ती.वै.म.व रु अंबाजोगाई येथे ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी पहील्या डोसकरीता लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहेत . • Ezee app वर नोंदणी केलेल्या नागरीकांना SMS / Whatsapp messages दवारे नागरीकांना लसीकरणाकरीता बोलावण्यात येत आहे . • ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी Ezee app वर नोंदणी करुन लसीकरणाकरीता टोकन क्रंमाक प्राप्त करुन घ्यावा , टोकन क्रंमाकानुसार प्राप्त मेसेज नुसार लसीकरण करावे , मेसेज नुसार लसीकरणाकरीता न आल्यास परत टोकन क्रंमाक प्राप्त करुन घ्यावा लागेल . • ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी घरबसल्या Ezee app https : ezee.live/Beed-covid19-registration या लिंकवर वर कोविड लसीकरणाकरीता नोंदणी करावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधकीशन पवार यांनी केले आहे.