बीड

निमय तोडणार्‍या आणखी 2386 जणांवर खटले, पाच लाख 28 हजार सातशे रूपयांचा दंडही वसूल


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणा अर्लट केली आहे. त्यानुसार नियम तोडणार्‍यांवर दररोज कडकपणे कारवाई केली जात आहे. 21 मे रोजी जिल्ह्यात 2386 नागरिकांवर खटले दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून पाच लाख 28 हजार सातशे रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या अधिसुचनेचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीसांची कारवाई तसेच नागरिकांना आवाहन . दि .21 / 05 / 2021 रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत – पोलीस ठाणे यांनी तसेच जिल्हा वाहतूक शाखा यांच्याकडून 1. तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांवर 766 खटले दाखल करून 1,94,100 रु . दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे . 2. विनाकारण फिरणारे , पोलीसांच्या सुचना न मानणारे , अवैध प्रवाशी वाहतुक करणारे , लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे , वाहनांचे नियम न पाळणारे अशा 1620 व्यक्तीवर जिल्ह्यात खटले दाखल करून 3,34,600 / – रु . दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे . बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दि.15-05-2021 ते 25-05-2021 या कालावधीत कडक निबंध लावण्यात आले आहेत . तरी विनाकारण घराबाहेर पडू नये . मास्कचा वापर करावा . नियमबाह्य प्रवासी वाहतुक करू नये . सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे . लसीकरणासाठी रूग्णालयात जाणारे व्यक्तींनी नियम पाळावेत . पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!