माजलगाव, दि. 18 (लोकाशा न्यूज) : माजलगाव शहरातील कोंविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची मोफत व्यवस्था बीड जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष जयसिंह भैय्या सोळंके यांनी केली आहे. कालपासुन या अन्नछत्राची सुरूवात झाली असून या अन्नछत्राची गोरगरिबांना मोठा फायदा होत आहे आणि येणार्या काळातही होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती म्हणून जयसिंह भैय्या सोळंके सध्या कर्तव्य बजावत आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सुत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना त्यांच्या सेवाधर्माचा चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. ‘उद्याचं बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. कारण जनतेचा प्रश्न छोटा असो की मोठा तो तात्काळ सोडविण्याचे काम ते तात्काळ करतात, त्यामुळेच आपल्या कामाचा नेता म्हणूनही त्यांची क्रेझ निर्माण झालेली आहे. सध्या संपूर्ण बीड जिल्हा कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात होरपळत असलेल्या गोरगरिबांच्या मदतीसाठी जयसिंह भैय्या धावून आले आहेत. त्यांनी माजलगाव याठिकाणी कोविड सेंटर मधील रूग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना दिवसभरात दोन वेळा मोफत जेवणाची सोय केली आहे. माजलगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील रूग्ण देखील माजलगाव येथिल 1) यशवंत कोंविड केअर, 2)योगिराज कोंविड केअर, 3) देशपांडे कोंविड केअर,4) माऊली कोंविड केअर,5) माजलगाव कोंविड केअर या ठिकाणी उपचार घेत आहेत. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रूग्ण व नातेवाईक यांच्या जेवणाची 2 वेळची व्यवस्था करण्यात आली आहे. भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे, शंतनु सोळंके, प्रशांत शेटे, सचिन झगडे, अल्ताफ मिर्जा,क्रष्णा रुद्रवार, हे सर्व नियोजन पाहत आहेत.
भैय्यांचा सेवाधर्म कधीच विसराळी पडणार नाही
सध्या कोरोनाच्या संकटामुळे जवळचे नातेवाईकही एकमेकांना मदत करायला तयार नाहीत, अशाच परिस्थितीत गोरगरिबांचा विचार करून जयसिंह भैय्यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवनाची सोय केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात भैय्यांनी उभा केलेला सेवाधर्म संबंधित नागरिकांच्या कधीच विसराळी पडणार नाही, असा विश्वासही आता व्यक्त केला जात आहे.