बीड

आता तर तुम्ही खतांची दरवाढ करुन शेतकर्‍यांच्या जीवावरच उठलात ! मोदी साहेब ही मस्ती नेमकी कशासाठी? एनसीपीच्या महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रज्ञा खोसरेंचा सवाल


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : मोठ्या विश्‍वासाने देशातील नागरिकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून त्यांचे केंद्रात सरकार आणले. अच्छे दिन आणू म्हणणार्‍या मोदींना सत्तेवर आल्यानंतर महागाई रोखता आली नाही. आता तर रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यास कंपन्यांना मुक संमती देवून ते तर शेतकर्‍यांच्या जीवावरच उठले आहेत. मोदी साहेब ही मस्ती नेमकी कशासाठी? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणावर लगावला आहे.      
सत्तेवर येण्यापुर्वी नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू म्हणाले, मात्र ते सत्तेवर येताच प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. महागाई वाढण्यास कारणीभुत ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘मोदी मतलब महंगाई’, मोदी साहेब स्वत:चा संसार नसला तरी देशातील लोक हे संसारिक आहेत, त्यांच्या दैनंदिन गरजा गॅस, पेट्रोल, आणि डिझेल ह्या आहेत, याचे जरा भान ठेवा. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या आहेत, याच्या किंमतीही कमी करण्यास आपण ठोस असे कोणत्याच उपाय योजना केलेल्या नाहीत, आता तर रासायनिक खतांची दरवाढ करण्यास कंपन्यांना मुख संमती देवून तुम्ही शेतकर्‍यांच्या जीवावरच उठलात, मोदी साहेब ही मस्ती नेमकी कशासाठी?, असा सवाल खोसरे यांनी विचारला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!