बीड

धक्कादायक, नागापूरात दोन भावांची हत्या, घटनेने जिल्हा हादरला


बीडः क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर दोन भावंडांच्या खुनात झाले . कुहाडीचे घाव घालत दोन भावांना निघृणपणे संपविण्यात आले . ही घटना सोमवारी ( दि . १७ ) रात्री ११ वाजता तालुक्यातील नागापूर ( खु . ) येथे घडली .

राम साळुके ( ५० ) व लक्ष्मण साळुके ( ४७ ) अशी मयतांची नावे आहेत . १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती . तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता ; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली . याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुके गेले होते . यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कु – हाडीचे घाव घालून निघृण खून करण्यात आला . या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके , सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली . पंचनामा करून शव जिल्हा रुग्णालयात पाठविले . मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले . परमेश्वर साळुकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!