बीड

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटू लागली, रविवारचा आकडा हजाराच्या आत, जिल्ह्यात 897 सापडले नवे रुग्ण


बीड, जिल्ह्यात मार्च महिन्यापासून वाढत जाणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात येवू लागला आहे . गत 15 ते 20 दिवसापासून जिल्ह्यात तब्बल 1200 ते 1500 च्या घरात रुग्ण निष्पन्न होत होते . त्यामुळे रुग्णालयात बाधित रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणेही अशक्य होवून बसले होते . याही परिस्थितीत आरोग्य विभागाने रुग्णांवर उपचार केले . असे असतांनाच आता कोरोना बाधितांची संख्या कडक निबंधामुळे व संचारबंदी कायम ठेवल्याने कमी होवू लागली आहे . आज रविवारी जिल्ह्यात केवळ 897 नवे कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे .

जिल्ह्यत शनिवारी 4 हजार 56 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती . त्याचे अहवाल आज रविवारी दुपारी प्राप्त झाले . यात 3 हजार 159 अहवाल निगेटिव्ह आले तर 897 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 97 , आष्टी 119 , बीड 116 , धारुर 48 , गेवराई 77 , केज 136 , माजलगाव 71 , परळी 57 , पाटोदा 102 , शिरुर 40 आणि वडवणी तालुक्यातील 374 जणांचा समावेश आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज 16 ते 25 मे या दरम्यान संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत . तसेच राज्यातही 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची कमी होणारी संख्या दिलासा देणारी ठरली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!