बीड, दि. 16 : मराठवाड्याचे सुपुत्र,काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे आतापर्यंत स्व.राजीव सातव यांचे योगदान केवळ काँग्रेस पक्ष पुरतेच नव्हे तर मराठवाडा आणि राज्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राहिले आहे सर्वात मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वांच्याच मनाला चटका बसला आहे स्वर्गीय काकू आणि स्व.सातव यांच्या मातोश्री यांचे निकटचे संबंध होते मराठवाड्यातील एक उमदे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड झाले आहे असे मनत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी खा. राजीव सातव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.