बीड

ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीचे प्राप्त होणार 30 हजार डोस, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास चारशे डोस वितरीत होणार,आज करावी लागणार नोंदणी

बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड 19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी 30,000 लससाठा प्राप्त होणार असुन प्रत्येक प्रा.आ.केद्रांस 400 डोसेस याप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे. दि.11 मे 2021 रोजी 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी जिल्हयात लसीकरण सत्र घेण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी 400 लोकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांनी सोमवारी दि.10 / 5 / 2021 रोजी प्रा.आ.केद्रांत जाउन नोंदणी करावी, 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुकाच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता 8700 लससाठा प्राप्त होणार असुन दररोज 200 डोसेस याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे.18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी मंगळवार दि .11 / 5 / 2021 पर्यंतची नोंदणी पुर्ण झाली असुन दि .12 / 5 / 2021 पासुनच्या लसीकरण सत्राकरीता सोमवार 10 / 5 / 2021 रोजी सांयकाळी 6 वाजता नोंदणी करता स्लॉट ओपन होणार आहे सांयकाळी 6 वाजेनंतर 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांच्यासह आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!