बीड

जुगार अड्ड्यावर बीड ग्रामीण पोलिसांची छापेमारी, नऊ जुगार्‍यांवर गुन्हा दाखल, 2 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : कोरोनाचे संकटातही जुगारी कुठे ना कुठे एकत्र येत आहेत. मात्र अशा जुगार्‍यांवर पोलिसांची करडी नजर आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी छापा टाकून तिर्रट नावाचा जुगार खेळताना नऊ जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे. यावेळी त्यांच्याकडील 2 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष साबळे आणि एपीआय उबाळे यांच्या नेतृत्वात गुरूवारी सव्वा चारच्या सुमारास पांगरबावडी शिवारात करण्यात आली आहे.
पांगरबावडी शिवारातील तिरूमला ऑईल शेजारी असलेल्या पडीक जमिनीत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे एपीआय वाय.डी.उबाळे यांना मिळाली होती, याची माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांना देवून त्या जुगार अड्डड्यावर पोलिस नाईक रविंद्र जाधव, पोलीस उप निरीक्षक रोटे, पोशि घटमळ यांना पाठविले, सव्वा चारच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणच्या जुगार अड्डवर छापा मारला, यावेळी गौतम भानुदास पवार (वय -47 वर्षे रा.घोडका राजुरी, ता.जि.बीड, तिंम्मा कनकपा गायकवाड (वय -52 वर्षे रा.ढोलेवस्ती, बीड बायपास ता.जि.बीड), दादासाहेब विष्णु कदम (वय -55 वर्षे रा. कुंभारवाडा रविवार पेठ बीड), कैलास रामभाउ कोरडे (वय -45 वर्षे रा. मोची पिंपळगाव ता.जि.बीड), नरेंद्र पंडीत शेळके (वय 43 वर्षे रा.तेलगाव नाका ता.जि.बीड), सिताराम भगवान आखाडे (वय , 51 वर्ष रा.मोची पिंपळगाव ता.जि.बीड), महेंद्र भागुजी धनवे (वय 51 वर्ष रा. घोडका राजुरी ता.जि.बीड), विलास सत्यभान पवार (वय 48 वर्ष रा.अर्जुन कॉटन मिल शेजारी बीड), विठ्ठल पिराजी अवचार (वय 48 वर्ष रा.मोची पिंपळगाव ता.जि.बीड) या नऊ जणांना जुगार खेळताना पकडले. यावेळी त्यांच्याकडील 2 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई एपीआय उबाळे यांनी केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन कोरोना विषाणुचा संसर्ग पसरेल अशी घातक कृती केल्याबद्दल जुगाराच्या गुन्ह्याबरोबरच त्या नऊ आरोपींवर भादवी कलम 188,269,270 सह कलम -51 ( बी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 सह क -12 अ मजुका सह कलम -17 मपोका प्रमाणे बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालवणमधील अवैध दारू विक्रीवरही छापा
पालवणमध्ये प्रविण नारायण मस्के हे अवैधपणे दारू विक्री करत असल्याची माहिती एपीआय योगेश उबाळे यांना मिळाली होती, याही ठिकाणी पोलिस निरीक्षक संतोष साबळे आणि एपीआय योगेश उबाळे यांच्या नेतृत्वात छापेमारी करण्यात आली, यावेळी 4360 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रविण मस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!