अंबाजोगाई
सौ गोजरबाई दगडू साहेब देशमुख माकेगावच्या राहणार त्यांच वय 67 वर्षाच . ग्रामीण भागात असल्याने कष्टाच शरिर करोना ची लागण झाली , स्कोर 20 निघाला उपचार येयील शासकिय रुग्णालयात सुरु होते काही दिवश icu काही दिवश जनरल वार्ड . उपचारासाठी दाखल झाल्या पासून त्यांनी हिमंत धरली . मला काहीच होणार नाही अस स्वःता सांगणाऱ्या आजीने अगदी पंधरा दिवशात करोनाला पिटाळून लावत स्वःतावर विजय मिळवला आणि करोना मुक्त झाल्या . विशेष म्हणजे दोन लेकीने आणि मुलानी न घाबरता आई जवळ रात्रंदिवश बसून सेवा केली . करोना झाला म्हणुन जवळ न जाणाऱ्या साठी हे आदर्श उदाहरण समोर आले . सुट्टी झाल्या नंतर आईच घरी जोरदार स्वागत केल .
करोनाच वाढत संकट त्यातच वाढलेला मृत्यूदर चिंतेची बाब असली तरी करोनाला घाबरले नाही . हिमत ठेवून आत्मबल जर वाढवल तर स्कोर कितीपण असो आपण त्याला पिटाळून लावू शकतो हे सिद्ध केल ते देशमुख आजी बाईनी फार मोठी हिमंत ठेवून अजाराचा सामना केला . मला काही होणार नाही हा विश्वास मनात ठेवला . किंचित घाबरल्या नाही . पंधरा दिवश उपचार झाले . ऑक्सीजन लावला ‘ रेमडि दिले पण आजी घाबरल्या नाही . 20 स्कोर होता आपण बारा पंधरा स्कोर आला कि उपचार घेण्या अगोदर घाबरतो . आजीनी हिमंत ठेवून लढा दिला त्याला यश आले आणि आजिने चक्क करोनाला अलगद हरवून पिटाळून लावले
बातमीत नोंद घेण्या सारखी दुसरी गोष्ट म्हणजे आई अजारी असतांना त्यांच्या दोन मुलीनी अगदी जवळ बसून दवाखान्यात त्यांची करोना नियमाच पालन करत सेवा केली . कारण मुलीच हे करू शकतात त्यासाठी मुली असण महत्वाच . मुलागा अमर देशमुख याने स्वःता आईची सेवा जातीनी केली न घाबरता . महेश काका लोमटे यांच्या सारखे भाच्चे काळजीला सोबत होते . डॉक्टर परिचारीका सर्वांनी परिश्रम घेतले
आई घरी आल्या नंतर सर्वांनी जोरदार स्वागत केले .