बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : राज्यामध्ये कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करीता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग कायदा 1897 , उठझउ 144 कलम आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. सध्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बध लावलेले आहेत. पोलीस अधीक्षक श्री आर. राजा यांनी जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना मधील अधिसूचनाचे उल्लघंन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणेदार यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच विनामास्क, विनाकारण फिरणारे, पोलीसांच्या सुचना न मानणारे, विना हेल्मेट दुचाकीवरुन फिरणारे, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे, लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे , विना पास प्रवास करणारे अशा प्रकारच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे . त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर चेक पोस्ट व नाकाबंदी पाईंट लावण्यात आलेले आहेत . त्यासाठी आळीपाळीने पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत.तसेच जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 79 फिक्स नाकाबंदी पाईंट लावण्यात आले आहेत.तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अचानक नाकाबंदी पाईंटस् नेमण्यात येत आहे . पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी व अंमलदार यांच्या गस्ती नेमण्यात आल्या आहेत.या गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी पब्लीक अॅड्रेस सिस्टिम वरून लोकांना आवाहन करत आहेत . तसेच महत्वाचे शासकीय रूग्णालये , कोव्हिड सेंटर येथे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. . दि .04 / 05 / 2021 रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1. तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्यांवर 382 खटले दाखल करून 99,750 रु . दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे . 2. विनाकारण फिरणारे , पोलीसांच्या सुचना न मानणारे , अवैध प्रवाशी वाहतुक करणारे , लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे , अशा 1330 व्यक्तीवर जिल्ह्यात खटले दाखल करून 3,21,200 / – रु . दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे . बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दि.05-05-2021 ते 07-05-2021 या कालावधीत कडक निबंध लावण्यात आले आहेत . तरी विनाकारण घराबाहेर पडू नये . मास्कचा वापर करावा . नियमबाह्य प्रवासी वाहतुक करू नये . सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे . लसीकरणासाठी रूग्णालयात जाणारे व्यक्तींनी नियम पाळावेत . पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.