बीडः- दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरणाकडे धाव घेत गर्दी करतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पोलीस प्रशासनाकडून सोशल डिस्टेंसिगचे पालन करण्याचे वारंवार सांगूनही नागरिकांकडून पालन केले जात नसल्याने आणि वाढत चालेल्या गर्दीमुळे बुधवार दि. 5 मे रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयातील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीवर लाठीचार्ज करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सुलिन लांजेवार व डीवायएसपी संतोष वाळके याच्यासह पोलीस कर्मचार्यांनी गर्दी अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कितीही सांगूण गर्दी आटोक्यात येत नसल्याने पोलीसांना लाठीचार्ज केला. यावेळी काही अधिकारी कर्मचारी जखमी झाले.















