बीड

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन ; आदेश डावलणाऱ्यावर थेट होणार फौजदारी


बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील कोविड -१ ९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवीन आदेश काढले आहेत . कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता नविन आदेश केले आहेत . १ ) बुधवार , गुरुवार व शुक्रवार ( दिनांक ०५/०५/२०२१ , ०६/०५/२०२१ व ०७/०५/२०२१ ) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत . 2 ) दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील . 3 ) गॅस वितरण दिवसभर सुरु राहील . 4 ) बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील . 5 ) शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ ) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी व कृषीशी संबंधित इ . ) केवळ ०७.०० ते ११.०० या वेळेत चालू राहतील . 6 ) शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ ) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकाळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे आदेशात म्हटले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!