मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफावसुली जोरात सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 431 रुपयांनी कमी झाला आहे. त्याने 50 हजारांची पातळी तोडली आहे. सोने सध्या 49950 रुपयांवर ट्रेड करत आहे. सोने 50 हजारांखाली आल्याने खरेदीसाठी वाट पाहणार्या ग्राहकांना आता संधी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
आज सकाळी कमॉडिटी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये नफावसुली दिसून आली. गेले दोन दिवस बाजारात चांदीची जोरदार विक्री सुरु असून भाव गडगडला आहे. सोन्याबरोबरच चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. करोना संकट आणि बाजारातील मागणी कमी झाल्याने सोने आणि चांदीचे सौदे गडगडले असल्याचे जाणकार सांगतात. सध्या कमॉडिटी एक्सचेंजवर चांदी भाव 1913 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 59300 रुपये झाला आहे. सोन्यावर 3 टक्के वस्तू आणि सेवा कर तसेच घडणावळ मजुरी आकारली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात सोन्याच्या किंमतीत 4 ते 5 हजारांची वाढ होते.
सराफातील तेजी झाकोळली; दोन दिवसात
चांदी 7000 रुपयांनी स्वस्त
सेेवीर्शींीीपी या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49640 रुपये आहे. तर 24 कॅरेटसाठी तो 50640 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49510 रुपये आहे. तर 24 कॅरेटसाठी तो 54010 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49750 रुपये आहे. तर 24 कॅरेटसाठी तो 52450 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 48810 रुपये आहे. तर 24 कॅरेटसाठी तो 53240 रुपये आहे.
मुदत ठेवीची चिंता; या बँका देत आहेत 7 टक्के व्याज
मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर संध्याकाळी 4 वाजता चांदीच्या दरात किलोमागे 900 रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा भाव एक किलोला 60400 रुपयांपर्यंत खाली आला होता. याआधी सोमवारी चांदीच्या किमती तब्बल 6300 रुपयांची घसरण झाली. औद्योगिक मागणी कमी झाल्याने कमॉडिटी बाजारात ट्रेडर्सने चांदीची विक्री करणे पसंत केले. सोमवारी चांदीचा भाव 9.3 टक्क्यांनी कमी झाला होता.
मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा समूहाने दिली ’ही’ ऑफर