Site icon लोकाशा-बंब न्यूज

शाळा प्रवेशाच्या वयात पुन्हा बदल

मुंबई, दि.19 : पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट ही कागदोपत्रीच राहणार असून प्रत्यक्षात साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार असून मुलांचे ३१ डिसेंबपर्यंतचे वय गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक कौशल्ये विकसित होण्यापूर्वी लेखन, वाचन असा अभ्यासाचा भार साडेपाच वर्षांच्या मुलांना सोसावा लागणार आहे. शाळेच्या वेळा, अभ्यासक्रमाचा ताण आणि त्याचबरोबर वयानुरूप कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन किती वर्षांच्या मुलांना कोणत्या इयत्तेत प्रवेश द्यावा याबाबतचा निर्णय शासनाने निर्णय जाहीर केला.

Exit mobile version