Site icon लोकाशा-बंब न्यूज

25 लाख परप्रांतीय मजूर अखेर मुंबईत परतले


मुंबई दि.13 सप्टेंबर :- लॉकडाऊन सुरू होताच रोजगार बंद असल्याने आपआपल्या राज्यातील गावाला निघून गेलेले परप्रांतीय मजुरांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 25 लाख परप्रांतीय मजूर रेल्वे मार्गे मुंबईत परतले आहेत.
23 मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मुंबईतील हातावर पोट असणाऱया मजुरांनी वाहतूक ठप्प असल्याने पायीच आपआपल्या राज्याची वाट धरली होती.
त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या. त्यानंतर 12 मे पासून राजधानी धर्तीच्या वातानुकूलित गाडय़ा दिल्ली ते देशाच्या 15 शहरांमध्ये सुरू केल्या. तसेच 1 जूनपासून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळीत 200 आरक्षित मेल-एक्सप्रेस गाडय़ांना सुरुवात झाली. लॉकडाऊन शिथील झाल्याने तसेच कार्यालये, दुकाने उघडण्याची तसेच टॅक्सी सेवांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्याने मुंबईत मजुरांनी मोठय़ा संख्येने परतण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version