Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुढचे तीन महिने धोकादायक

मुंबई, दि.02:-  कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा आणखी तीन महिने राखीव ठेवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात सुधारित अधिसूचना काढण्यात आली आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचं पालन करणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असून करोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.

राज्य या शासनाच्या या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक असणारे.

दरम्यान, सुधारित अधिसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सीजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

Exit mobile version