बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिवकुमार स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवकुमार स्वामी हे सध्या उस्मानाबादला निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. मागील अडीच वर्ष संतोष राऊत यांनी आरडीसी म्हणून उत्तम पध्दतीने काम केलेले आहे. त्यांच्या कामामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना खर्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची कारकिर्द बीड जिल्हावासियांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.
संतोष राऊत यांची बदली, आता शिवकुमार स्वामी बीडचे नवे आरडीसी
