Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात वीजेचा तांडव ! वीज कोसळून गर्भवती महिलेसह दोघींचा मृत्यू; पाच जनावरेही ठार


बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील बहुतांशी भागात रविवारी (दि.02) दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून बीड तालुक्यातील गर्भवती महिलेसह केज तालुक्यातील अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे मृत्युमूखी पडले.
मागच्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात आवकाळीपासून रूद्ररूप धारण केल्याचे पहायला मिळाले, रविवारी दुपारी विजांचे अक्षरश: तांडव पाहायला मिळाला. विशेषत: बीड, केज आणि अंबाजोगाई, धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील नेकनूरच्या लोखंडे वस्तीवरील राधाबाई दिपक लोखंडे (वय 20) ही महिला दुपारी शेतात काम करत होती. पाऊस सुरू झाल्याने ती घराकडे परतत असताना तिच्यावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, राधाबाईच्या समोर असणारी तिची सासू किरकोळ जखमी झाली. मयत राधाबाई ही आठ महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसर्‍या घटनेत केज तालुक्यातील पिट्टीघाट येथील गीता जगन्नाथ ठोंबरे (वय 52) या महिलेचा मृत्यू झाला. गीता ठोंबरे या शेतात असताना त्यांच्यावर वीज कोसळली. तसेच नेकनूर जवळील सानपवाडीतही विजेचा कहर पाहावयास मिळाला. सानपवाडी शिवारात वीज पडून बाबासाहेब नामदेव गित्ते यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले. तर, अंबाजोगाई शहरातील मेंढी फार्मजवळ चांदमारी परिसरात वीज कोसळून आजीम खान यांच्या मालकीच्या दोन गाई आणि एक शेळी दगावल्याची घटना उघडकीस आली.

Exit mobile version