Site icon लोकाशा-बंब न्यूज

उत्कृष्ट कर्तव्य बजावणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालकांकडून पदके जाहिर, तळेकर, शेख सलीम, रेडेकर अन् मनोज वाघ ठरले मानकरी


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : सन 2020 मधील उत्कृष्ट सेवेबद्दल जिल्हा पोलिस दलातील एका अधिकार्‍यासह तीन पोलिस कर्मचारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत. याबद्दल या चौघांचेही पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, सुनिल लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने गृहविभागाच्या दि.13-04-2017 च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल पदके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येतात. सन 2020 या वर्षाकरीता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दि.30-04-2021 रोजी मा . पोलीस महासंचालक महा.राज्य मुंबई यांनी बोधचिन्ह व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्याबाबत आदेशित केले आहे . त्यामध्ये बीड पोलीस दलातील , 1 ) पोलीस निरीक्षक , राजीव आसाराम तळेकर नेम.बीड यांनी क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून खटले कोर्टात दाखल केले आहेत. तसेच 157 बक्षिसे आजपर्यंत मिळाली आहेत. यांनी महाराष्ट्र पोलीस दलात औरंगाबाद शहर, एस पी यु , हिंगोली , जळगांव , बुलडाणा, जालना , बीड या ठिकाणी उत्कृष्ट आणि गुणवत्तापुर्ण सेवा बजावली आहे. 2 ) पोह / 1163 , शेख सलीम शेख हबीब नेम.स्थागुशा बीड यांनी सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख तसेच 317 बक्षिसे आजपर्यंत मिळाली आहेत, यांनी बीड पोलीस दलात पोमु बीड , बीड शहर , सायबर सेल , स्थागुशा या ठिकाणी उत्कृष्ट आणि गुणवत्तापुर्ण सेवा बजावली आहे. 3 ) मपोह / 842 , मिरा महादेव रेडेकर नेम शिवाजीनगर यांनी सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख तसेच 226 बक्षिसे आजपर्यंत मिळाली आहेत. यांनी बीड पोलीस दलात पोमु बीड , बर्दापुर , स्थागुशा , बीड ग्रामीण , शवाशा , शिवाजीनगर या ठिकाणी उत्कृष्ट आणि गुणवत्तापुर्ण सेवा बजावली आहे . 4 ) पोना / 13 , मनोज राजेंद्र वाघ नेम , स्थागुशा बीड यांनी सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख तसेच 285 बक्षिसे आजपर्यंत मिळाली आहेत. त्यांनी बीड पोलीस दलात माजलगांव शहर, आगुशा, स्थागुशा, सायबर सेल या ठिकाणी उत्कृष्ट आणि गुणवत्तापुर्ण सेवा बजावली आहे .

Exit mobile version