Site icon लोकाशा-बंब न्यूज

…तर नियम तोडणाऱ्यावर कारवाईच होणार – रविंद्र जगताप


बीड, 30 एप्रिल : उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे covid – 19 संदर्भात दाखल फौजदारी सू – मोटो जनहित याचिका क्रमांक 022021 मध्ये मा . उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 26.04.2021 रोजी आदेश देऊन लॉकडाऊनच्या कालावधीतील निबंधांच्या अनुषंगाने नागरिकांनी बाहेर पडताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर प्रशासनाने घ्यावयाच्या दक्षता आणि करावयाच्या कार्यवाही बाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. सदर निर्देशांमध्ये 1 . लौकडाऊन निबंधातील सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते अकरा या कालावधी व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी वाहनाद्वारे कोणत्याही व्यक्तीस बाहेर जावयाचे असल्यास त्यांनी त्याच्या सोबत आधार कार्ड बाळगणे अनिवार्य राहील. आधार कार्ड नसल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल , अॅम्बुलन्स मधिल कर्मचारी व रुग्ण यांना या आदेशातून सूट देण्यात आलेली आहे . 2 . डॉक्टर्स वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचारी यांनी देखील त्यांचे सोबत आधार कार्ड बाळगणे आनिवार्य राहील . 3 . हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य राहील यामुळे डोळ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही . 4 . घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंडावर व्यवस्थितपणे मास्क लावावा व्यवस्थित मास्कन लावणारे व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरून कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल . 5 वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी लॉकडाऊनच्या निबंधांचे भंग करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड चा फोटो घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करू शकतील तसेच अशा व्यक्तींची Rapid Andign Test करू शकतील . 6 . लोकप्रतिनिधी विविध , राजकीय पक्षांचे पदाधिकारी , म.न.पा. /ना.पा./जि.प./ग्रा.प . सदस्यांना लॉकडाऊन निबंधातून सूट दिली जाऊ नये तसेच त्यांनी या बाबतीत कोणत्याही दोषी व्यक्तींना सोडण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांवर दबाव अथवा प्रभाव टाकू नये , 7 . उपरोक्त निर्देश हे कर्तव्यावर नसलेल्या सर्व लोक सेवकांनाही लागू राहतील . मा . उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दाखल फौजदारी सुमोटो जनहित याचिकेत उपरोक्त प्रमाणे दिलेल्या निर्देशांचे जनतेने कसोशीने पालन करावे या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी, असे रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्र. यांनी म्हटले आहे.

Exit mobile version