Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्य सरकारच्या निर्णयामुळे गोरगरिबांना आधार ! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार, ज्यांना शक्य असेल त्यांनीही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावेत – अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे, असे असले तरी एक मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला पदाधिकारी लसीचे हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहोत, असा निर्णयच प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे, मीही माझ्या कुटूंबियांसह नातेवाईकांचे लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनीही सरकारला संकट काळात मदत म्हणून लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वच यंत्रणावर मोठा ताण येत आहे, हाच ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचा एक सुजान नागरिक म्हणून सर्वांनी पुढे येण्याची आज गरज असल्याचे अ‍ॅड खोसरे यांनी म्हटले आहे. दरम्यान सरकारने मोफत लस देण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचेही यावेळी खोसरे यांनी कौतूक केले असून त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Exit mobile version