Site icon लोकाशा-बंब न्यूज

“ताई लवकर बरे व्हा…! पंकजाताई यांची कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे ताइंचे आवाहन

परळी वैजनाथ , प्रतिनिधी …. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता माजीमंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे . भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत . कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त पंकजाताई मुंडे यांच्या फेसबुकवर देण्यात आले आहे.दरम्यान , काळजीचे कारण नाही . गेल्या काही दिवसांपासून आपण घरात आयसोलेट झालेलो आहोत.आज सकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . सर्वांनी काळजी घ्यावी , सोशल डिस्टंसिंग पाळत कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते , नागरिक यांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे . ताईचा रिपोर्ट पॉज़िटिव येताच, ताई लवकर बरे व्हा, अशी साद सम्पूर्ण राज्यातून घातली जात आहे.

Exit mobile version