Site icon लोकाशा-बंब न्यूज

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, गोविंदपूर येथील फाशी प्रकरण, उसतोडीच्या पैशांवरून दिला जात होता मानसिक शारीरिक त्रास


माजलगाव, दि. 28 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील गोविंदपूर येथील सुभाष समिंदर गायकवाड वय 37 याने दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातील अडूला फाशी घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी मयताची पत्नी विजयमाला सुभाष गायकवाड हिच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष समिंदर गायकवाड हा उसतोडीच्या काम करीत होता. त्याने उसतोडीसाठी आरोपींकडून पैसे घेतले होते. यातही बरेच पैसे त्याने दिले मात्र उर्वरित पैशांसाठी आरोपींकडून सारखा तगादा सुरू होता तसेच त्यास मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून सुभाष याने दिनांक 24 एप्रिल रोजी घरातील अडूला फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी माझे पतीला त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पत्नी विजायमाला हिच्या फिर्यादीवरून कृष्णा रामा गायकवाड, बुवाजी मोहन गायकवाड , मोहन संतराम गायकवाड, दगडू सखाराम शिंदे (पोट मुकादम ) कलावती दगडू शिंदे सर्व रा. गोविंदपूर ता. माजलगाव यांच्या विरुद्ध 306 , 34 भा.दं.वि. अनव्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दाभाडे हे करीत आहेत.

Exit mobile version