तेलगाव, दि.28 (लोकाशा न्यूज) : तालेवाडी फाट्याजवळ दिलीप बिल्डकॉन कंपनीचे रस्त्याचे काम चालू असलेले खड्ड्या जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोराची धडक देऊन शांताबाई रुस्तुम तौर (वय ४३) ह्या जागी ठार झाले आहेत तर रुस्तुम तौर व नातं जखमी झाले आहेत. हे राहणार रिधोरी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील आहेत. लोकनेते सुंदर रावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यामध्ये रुस्तुम तौर कर्मचारी आहे. या रस्त्याचे काम बरेच दिवसांपासून झाले होते. परंतु सारखेच रस्त्यामध्ये खड्डे पडत आहे. दिलीप बिल्डकॉन चांगले व्यवस्थित काम केले नाही. त्यामुळे एकेरी मार्गावरून जावे लागत आहे. दरम्यान , वाळू वाहतूक करणारे टिप्पर ही सापडले नाही.
वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत महिला ठार
