बीड : कोविड 19 च्या प्रथम लाटेदरम्यान केंद्र सरकारने पीएम केअर निधीतून बीड जिल्ह्यासाठी व्हेंटीलेटर्स पाठवले होते. त्यापैकी सध्यस्थितीत काही बंद अवस्थेत आहेत. सध्याच्या या कोरोना संकटात सदरील व्हेंटीलेटर दुरूस्त करून सेवेत कार्यरत करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी याबाबत आपण त्वरीत कारवाई करावी अशी मागणी खा. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
बंद आवस्थेतील व्हेंटीलेटर तात्काळ दुरूस्त करून सेवेत कार्यरत करा, खा. प्रीतमताईंची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
