बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण देश, महाराष्ट्र परेशान आहे, अशा परिस्थितीत मात्र भाजपचे राज्यातील बरेच नेते केवळ आणि केवळ राजकारण करत आहेत. यावेळी आपण नेमके काय बोलतोय याचे भाणही सध्या त्यांना राहिलेले नाही, 31 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारकडून राज्याला सर्वाधिक चार लाख 35 रेमडीसीवरचा पुरवठा होणार आहे, अशी एक पोस्ट भाजपचे आ. अतूल भातखळकर यांनी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टचा आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘‘अतुल भातखळकर नावाचा भाजपचा आमदार 31 एप्रिलपर्यंत राज्याला रेमडिसीवीर येणार म्हणतो..’’ आरे बाबा 31 एप्रिल हा दिवस कॅलेंडरमध्येच नाही तु कुठून आणला?, असा टोला खोसरे यांनी आपल्या पोस्टमधून लागवला आहे. यावरूनच आ. अतूल भातखळकर चांगलेच तोंडावर आपटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.