Site icon लोकाशा-बंब न्यूज

केंद्राकडून बीड जिल्ह्यातील सात रस्त्यांच्या कामांसाठी 73 कोटींचा निधी, विकास कामात आमचं सरकार कधीच मागे हाटणार नाही, खा. प्रीतमताईंनी ना. नितीन गडकरींचे मानले आभार


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : भाजप सत्तेत येताच बीड जिल्ह्यातील विकासासाठी निधी वर्षाव सुरू झाला, तो आजही कायमच आहे. नुकतेच सीआरएफ अंतर्गत बीड जिल्ह्यातील सात रस्त्यांच्या कामाला मंजूरी देवून या कामासाठी 73 कोटी 72 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विकास कामात आमचं सरकार कधीच मागे हाटणार नाही, असे म्हणत खा. प्रीतमताईंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
विकासाचा एक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे ह्या अविरतपणे काम करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला आणि सध्याही येत आहे. मुंडे भगिणींनी केलेल्या प्रयत्नामुळेच बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्‍न खर्‍या अर्थाने सुटला, तसेच राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करून संपूर्ण बीड जिल्हा देशाला जोडण्याचे मोठे काम मुंडे भगिणींनी केले. ज्या गावांनी कधी रस्ताच पाहिला नव्हता त्या गावांना रस्ता देण्याचेही काम मुंडे भगिणींनी केले, त्यांचा शब्द कधीच व्यर्थ जात नाही, त्यांनी जे काम हाती घेतले ते मार्गीच लागते. सध्या राज्यात सत्ता नसली तरी फक्त आणि फक्त मुंडे भगिणींमुळे आजही केंद्रातून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधींच्या निधीचा वर्षाव सुरू आहे. नुकताच सीआरएफ अंतर्गत बीड जिल्ह्यातील सात रस्त्यांच्या कामाला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारा 73 कोटी 72 लाख रूपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दलच खा. प्रीतमताईंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Exit mobile version