Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर रेमडीसीवीरमधील काळाबाजार उघड, 22 हजारांना रेमडीसीवीर विक्री करताना दोघांना पकडले, शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : अखेर रेमडीसीवीरमध्ये उघड-उघडपणे काळाबाजार होत असल्याचे बीडमध्ये समोर आले आहे. चक्क 22 हजार रूपयांना रेमडीसीवीर विक्री करताना दोन तरूणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी रात्री केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे (ता.धारूर) व कृष्णा ठोंबरे (रा.दहिफळ ता.केज) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत. रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रूग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रूपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलिस कर्मचारी संघर्ष गोरे यांनी नाईकवाडे आणि ठोंबरे या दोन्ही  तरूणांना पकडले. याप्रकरणी त्या दोघांवरही शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version