Site icon लोकाशा-बंब न्यूज

कामात हालगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करणार – जिल्हाधिकारी, आता बेड उपलब्धतेची माहिती प्रत्येक तासाला ‘कोविड बीड पोर्टल’वर मिळणार


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात वाढती रूग्ण संख्या आणि मृत्यूची संख्या लक्षात घेवून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आता कडक अ‍ॅक्शन घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रत्येक तासाला बेड उपलब्धतेची माहिती ‘कोविड बीड पोर्टल’वर आता अपलोड केली जाणार आहे. या कामात हालगर्जीपणा केला तर संबंधित फॅशीलीटी नोडल ऑफिसरवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. असे स्पष्ट आदेशच मंगळवारी जिल्हाधिकारी जगताप यांनी काढले आहेत.
दि. 31 मार्च 2021 आदेश राज्य शासनाने कोविड -19 साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 23 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली असुन स्वतंत्ररित्या निर्गमीत करण्यात आलेली आहे. ज्याअर्थी, राज्य शासनाने विषाणुमुळे होणार्‍या कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासुन लागु केला आहे. त्याअर्थी, बीड जिल्हा प्रशासनामार्फत कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही असुन विविध उपाययोजनांद्वारे कोविड -19 साथरोगास आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग काम करित आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये जिल्हयातील डीसीएच, डीसीएचसी,सीसीसी फॅशीलीटी नोडल ऑफिसर यांना सुचित करण्यात येते की, सध्या जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. नातेवाईकांना हॉस्पिटल निहाय बेडची उपलब्धता माहिती नसल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. यामध्ये बराच वेळ जात असुन रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यातील सर्व रुग्णांना कोविड हॉस्पिटल निहाय बेडची उपलब्धता रिअल टाईममध्ये आवश्यक आहे. त्यासाठी कोविड बीड पोर्टल तयार करण्यात आले असुन त्यामध्ये प्रत्येक फॅशीलीटी नोडल ऑफीसरांनी प्रत्येक एक तासाला बेड उपलब्धतेची माहिती उपरोक्त पोर्टल वर अपडेड करावी. यामध्ये हलगर्जीपणा किंवा दिरंगाईपणा दिसल्यास आपणावर भारतीय दंडसंहिता 1890 (45 ) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल आणि इतर कलमासह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.

Exit mobile version