Site icon लोकाशा-बंब न्यूज

कृतिशिवाय कोरोनाची गती थांबणार नाही, प्रथमदर्शनी लक्षणे आढळली तर तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करा – खा. प्रीतमताई


बीड, मागील चार दिवसांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत असताना कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघितली.दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाने रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली आहे,कोरोनाचे संक्रमण रोखून साखळी तोडायची असेल तर बदलत्या लक्षणांबाबत जनजागृती आवश्यक आहे.यासंदर्भात आरोग्य विभागाला देखील सूचना केल्या आहेत.

सद्यस्थितीत कोणताही आजार अंगावर काढून घेणे व टाळाटाळ करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.प्रथमदर्शनी लक्षणे आढळली तर तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करा.प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर यंत्रणेवरील भार कमी होईल.सध्या आरोग्य व्यवस्थेवर अभुतपुर्व तणाव आहे.वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर्स,सिस्टर्स, वॉर्डबॉय,रुग्णवाहिका चालक हे सर्व सैनिकाच्या भूमिकेत कोविड संकटाला धैर्याने सामोर जात आहेत.आपल्या सजगतेमुळे त्यांना मदत होईल.
मास्क,सॅनिटायजर वापरा,सामाजिक अंतर राखा.कोविड उचित वर्तन काळाची गरज आहे.कृतीशिवाय कोरोनाची गती थांबणार नाही, असे खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version