Site icon लोकाशा-बंब न्यूज

जयदत्त आण्णांची रेमडेसीवीर इंजेक्शन साठी तत्परता,आण्णांचा आरोग्य मंञ्यांना फोन, तात्काळ 500 रेमडेसीवीरचे इंजेक्शन जालन्यातुन बीडला वर्ग

बीड, सध्या रेमडेसीवीर इंजेक्शन साठी मोठ्या प्रमाणात जिल्हात व बीड मतदारसंघात रुग्णांची व परिवाराची हेळसांड होत आहे.यामध्ये मोठा तुटवडा जाणवत असुन रोज 2 हजार इंजेक्शन ची आवश्यकता जिल्हासाठी आहे. ही बाब आज फोन करुन राज्याचे आरोग्य मंञी राजेश (भैय्या) टोपे यांना जयदत्त आण्णांनी निदर्शनास आणुन दिली. त्यांनी तात्काळ यंञणा हलवत 500 इंजेक्शन प्रिया एजन्सी जालना येथुन मा.जिल्हाधिकारी बीड यांच्या कडे वर्ग केले आहेत. ते इंजेक्शन आणाण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचा एक प्रतिनिधी जालन्याला रवाना झाला आहे.
तसेच पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन चा पुरवठाही करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी केली आहे

Exit mobile version