Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घ्या – खा. प्रीतमताई मुंडे


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : मागच्या दिड वर्षांपासून बीड जिल्हावासियांबरोबरच संपूर्ण देशवासियांना कोरोनाचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वाढता प्रादुर्भाव बघता 19 एप्रिल पासून होणार्‍या एमबीबीएसच्या परिक्षा दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर घेण्यात याव्यात, परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी जवळपास 450 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत, सदर परिस्थिती लक्षात घेवून आपण लवकरच सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करते, असे जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी एका पोस्टव्दारे म्हटले आहे.

Exit mobile version