Site icon लोकाशा-बंब न्यूज

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद राहणार?


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज):- कोविडचे नियम पाळून चार ते पाच एप्रिल रोजीच्या आदेशात नमूद केलेल्या अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या अस्थापना सकाळी सात ते आठ दरम्यान खुले राहू शकतात जर त्या अनेक वस्तू विकत असतील ज्यांच्यापैकी काही अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडत नसतील अशा आस्थापना बंद राहतील. या दोन दिवसीय लॉकडाऊनमध्ये सर्व आवश्यक सेवा देणार्‍या आस्थापना खुल्या राहणार. कोणतीही व्यक्ती वैध कारणाशिवाय बाहेर पडू शकणार नाही. कोविडचे नियम पाळून कृषी उत्पन्न बाजार समित्या चालू राहतील. बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहणार. गॅरेज हे वाहतुकीसंबंधीत आवश्यक बाब असल्याने ते चालू राहणार मात्र ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्टस्ची दुकाने बंद राहतील. गॅरेजमध्ये कोविडचे नियम न पाळल्यास ते बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असून सर्व केंद्र शासनाचे व खासगी क्षेत्रातील युनिटच्या कर्मचार्‍यांचा समावेश अत्यावश्यक सेवा पुरवठा म्हणून करता येणार नाही. परंतु केंद्र शासन/खासगी क्षेत्रातील युनिटमधील सेवा ज्यांचा समावेश अत्यावश्यक सेवा म्हणून करण्यात आला आहे तेथील कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून गणले जाईल. 4 एप्रिलच्या आदेशानुसार नागरिक बारमधून दारू खरेदी करू शकतील किंवा बारमधून दारू घरपोच घेऊन जाऊ शकतील मात्र वाईनशॉप बंद राहतील. रोडलगतची धाबे पार्सलची सेवा करू शकतील. एसी, कुलर, फ्रिज इत्यादी दुरुस्तीची दुकाने बंद राहतील. दूरसंचार संबंधित उपक्रमे (लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप कॉम्प्युटरची दुकाने बंद राहतील.) आपले सरकार सेवा केंद्र/सेतू/सीएससी केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र हे सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायं. 8 पर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंटची सेवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या वेळेपर्यंत कार्यरत राहील. परंतु रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण्याची मुभा नसून केवळ पार्सल  उपलब्ध होऊ शकतील. उद्योग मात्र बंद राहणार आहेत. 

Exit mobile version