Site icon लोकाशा-बंब न्यूज

जागेच्या वादातून ३८ वर्षीय युवकाचा खून

गेवराई : लोकाशा न्युज  जागेच्या वादातून सावत्र आईसह अन्य दोघांनी मुलाला केलेल्या हाणामारीत मुलाचा खून झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लुखामसला येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील भगवान डोमाळे यांना दोन पत्नी असून सात अपत्य आहेत. यापैकी पाडूरंग भगवान डोमाळे (वय ३८ )वर्ष यांचा व इतर सावत्र भावाचा जागेचा वाद होता.हा वाद आपसात मिटत नव्हता यामुळे त्यांचे सतत भांडण होत होते. दरम्यान गुरुवार दि.१ रोजी रात्री हा वाद हाणामारीपर्यत गेला असता पांडुरंग डोमाळे यांच्या डोक्यात कुऱ्हाड लागली होती. यामुळे पाडुरंग यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.शुक्रवार दि. २ एप्रिल रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला असता सावत्र आई , तिचा सख्खा मुलगा आणि मुलाच्या मुलाने मिळून खून केल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध कलम ३०२,५०६,३४,३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान मारेकरी फरार असून याप्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे हे करीत आहेत .

Exit mobile version