बीड(प्रतिनिधी) पिंपळनेर हद्दीतील बीड नाथापूर रोडवर असलेल्या नागापूर जवळील एका इमारती मध्ये बनावट दारू बनवत असल्याची माहिती मिळल्यावरून राज्यउत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी छापा मारून मोठ्याप्रमाणात साहित्य जप्त केले असल्याचे समजते सदरील कारवाई ही सायंकाळ च्या दरम्यान करण्यात आली आहे सदरील कारवाईने पिंपळनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याठिकानाहून 2600 लिटर स्पिरिट व इतर यंत्र सामुग्री जप्त करण्यात आल्याचे समजते
पिंपळनेर हद्दीत बनावट दारू कारखान्यावर छापा
