बीड (प्रतिनिधी):- सध्या कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बीड शहरातही कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागले असून या बाबत तातडीने उपाय योजना हाती घेण्यात याव्यात अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केल्या होत्या. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या सूचनानुसार उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी स्वत: उभे राहून बीड शहरात निर्जंतुकीकरण फवारणीचे काम हाती घेवून सदर कामाची पाहणी केली. बीड शहरात कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता सदर पाऊल उचलले आहे. बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पालिका प्रशासनाकडून कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्याबाबत काहीच हालचाली केल्या जात नसल्याने याबाबत नागरिकांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी केलेल्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी बीड शहरात कोरोना संदर्भातील उपाय योजना करण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी यावेळी नगरसेवक आमेर अण्णा, जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, झुंजार धांडे, सचिन पवार, अजय सूरवसे, बाळासाहेब राऊत, निलेश चव्हाण, मोमीनपुरा भागात नगरसेवक लक्ष्मण इटकर, ख़ुर्शीद आलम, सुनील महाकुंडे, एजाज सौदागर, समीर सौदागर, रफ़ीक कुरेशी तसेच अग्निशामक दलाचे सर्व प्रमुख अधिकारी धायतीडक ,कानतोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आ.संदिप क्षीरसागरांची सूचना, बीड शहरात निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामास सुरूवात ,उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केली पाहणी; कोरोना रूग्ण संख्या वाढताच पालिका प्रशासनाचे उचलले पाऊल
