Site icon लोकाशा-बंब न्यूज

जयदत्त अण्णांनी पाच दिवसात कोरोना हरवला, लसीचा फायदा झाला, चुटकीत कोरोना गेला


बीड : कोरोना सहज हरवला जाऊ शकतो हे स्वत सिद्ध करून अण्णांनी लोकांना ऊर्जा दिलेली आहे. 67 वर्षीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी केवळ पाच दिवसात कोरोना घरूनच हरवला, त्यांना लसीचा फायदा झाल्याची चर्चा असून लोकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोनाशी दोन हात करायला सक्षम व्हावे असा संदेश यातून दिलेला आहे. परमेश्वर कृपेने, साधू – संतांच्या आशीर्वादामुळे आणि जनताजनार्दनाच्या सदिच्छा यामुळे आज माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे असे फेसबुकवर जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे . केवळ पाच दिवसात त्यांनी कोरोनावर केलेली मात इतरांना आधार व बळ देणारी आहे , अनेकांना कोरोना या नावाने धसका बसलाय , काहींनी तर कोरोना म्हणजे निरोपाचा कार्यक्रम असेच समजून घेतले आहे मात्र काल 361 लोकांनी कोरोना लोळवून हा गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे त्यात सर्वाधिक प्रेरणा देणारे नाव म्हणून जयदत्त अण्णा क्षीरसागर हे समोर आले आहे. लक्षणे नव्हते , डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबईतल्या घरीच विलीगीकरण करून घेण्यात आले . साधारण आहार मात्र वेळेवर त्यांनी घेतला अगदी सहज केवळ पाच दिवसात त्यांनी कोरोनावर मात केली . त्यांच्या या लढ्याने कोरोनाच्या भीतीत वावरणार्‍या समाज मनाला प्रेरणा मिळाली आहे .

Exit mobile version