Site icon लोकाशा-बंब न्यूज

अ‍ॅडीशनल सीईओंच्या भेटीने धारूरची आरोग्य यंत्रणा तरतरीत, टेस्टींग तर वाढवाच त्यासोबत लसीकरणालाही गती द्या – आनंद भंडारी


धारूर, दि. 6 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोनाची संख्या गतीने वाढत चालली आहे. याला रोखण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. त्याअनुषंगानेच मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी धारूर पंचायत समितीमध्ये बैठक घेतली, त्यांच्या या भेटीने धारूरची आरोग्य यंत्रणा तरतरीत झाली आहे. टेस्टींग तर वाढवाच त्यासोबत लसीकरणालाही गती द्या, अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार याठिकाणची आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने बीड जिल्ह्याला पुर्णपणे घेरले आहे. मंगळवारी दिवसभरात 713 रूग्णांना कोरोनाची बाधा झाला आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती भयाणक होत असल्यामुळे आता प्रशासनाने कामात प्रचंड गती घेतली आहे. कोरोनाची हीच स्पीड रोखण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी धारूर पंचायत समितीमध्ये अधिकारी, आणि डॉक्टरांची बैठक घेतली, टेस्टींग वाढविण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत. तसेच लसीकरणाचे योग्य नियोजन देवून त्याला गती देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ज्या लोकांना लक्षणे आहेत, त्या लोकांना तात्काळ उपचार घेण्यास सांगा, त्यांची माहिती दडवू नका, अशा सुचनाही यावेळी भंडारी यांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. भंडारींच्या या भेटीने धाररूरची आरोग्य यंत्रणा तरतरीत झाली आहे.

विकास कामांचाही घेतला आढावा,
करवसूलीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश

मंगळवारी आनंद भंडारी यांनी पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या विकास कामांचाही आढावा घेतला, विशेष कर वसूलीचे प्रमाण वाढविण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version