Site icon लोकाशा-बंब न्यूज

खुशखबर 361 रुग्णांचा आज कोरोनावर विजय; बीड आरोग्य यंत्रणेवर रुग्ण खुश

आज बीड जिल्ह्यातून सर्वाधिक रुग्णांनी कोरोनावर मात करण्याचा एकदिवसीय विक्रम केला आहे . लोकाशा च्या टीम कडून सर्व कोरोना वॉर्डांना भेट देऊन रुग्णांच्या प्रतिक्रिया घेतल्या , जेवण व उपचार पद्धतीवर समाधान व्यक्त करत समाधान व्यक्त करण्यात आले . कोरोना ची भीती वाटत नाही असे सांगताना विधी महाविद्यालयात एका रुग्णांनी कशाला सुट्टी इथेच मज्जा आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली . तबल 361 रुग्णांनी कोरोना हरवला असल्याने सकारात्मक ऊर्जेचा डोस जिल्ह्याला मिळाला आहे . दैनिक लोकाशा कडून लोकपत्रकार भागवत तावरे उपसंपादक नितीन चव्हाण, उपसंपदाक अभिजित नखाते व उपसंपादक मुकेश झनझने यांनी रुग्णांना अंतरावरून भेटी दिल्या . गणी भाई बागवान यांच्या बद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त करत उत्तम जेवण देत असल्याचे म्हटले

Exit mobile version