Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात गोंधळ आणि ‘समुद्र किनारा’

बीड : लॉकडाऊन उघडले आणि बारा तासात पुन्हा लागले असेच लोकांना वाटत आहे कारण जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशामध्ये गरिबांचे दुकाने बंद आणि मिठाईचे असा नियम समोर आला आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हासाठी काढलेल्या आदेशात समुद्र किनारा बंद राहणार असल्याचा अजब नियम देखील काढले आहेत. आदेशात राज्यशासनाच्या गाईडलाईन असून त्यात हात पदरचे नियम लावून निघालेला आदेश सामान्य लोकांना गोंधळात टाकणारा ठरत आहे. सामान्य लोकांना नेमके काय चालू आणि काय बंद हे सांगण्यात प्रशासन अयशस्वी झाले आहे. अत्यावश्यक सेवेत मेडीकल सोबतच आता किराणा भाजीपाला आलेला असून रिक्षे रहदारीत दिसणार आहेत. मिठाईचे दुकान चालू केल्याने शासनाच्या मनात नेमका कुठला अनंद आहे अशा भावना छोटे व्यापारी करत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी नविन आदेश काढत, जिल्ह्यात परत नवे नियम लागु केले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडत सर्व दुकाने बंद ठेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. 30 एप्रिल पर्यंत हा नियम लागु राहणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 25 दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पुर्वीचे दहा दिवस व आता परत 25 दिवस बंद म्हणटल्यावर दुकानदारांनी काय करायचे असा प्रश्‍न येथील दुकानदारांसमोर पडला आहे.

Exit mobile version