Site icon लोकाशा-बंब न्यूज

माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

पुणे येथील जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी माहिती उपसंचालक ,व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे पहाटे निधन झाले .शासकीय नोकरीत असून देखील विनोदी शैलीतील खास वेगळ्या व्यंगचित्रामुळे त्यांनी आपलं वेगळेपण जपलं होत,त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे .
बीड,परभणी,औरंगाबाद, नांदेड,नगर,लातूर,नागपूर,पुणे अशा अनेक जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सेवेत राहिलेले ,ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये एक मित्र म्हणून जास्त मिसळून जात.
शासकीय कामासोबतच एक नर्म विनोदबुद्धी अंगी असलेला हा अधिकारी राज्यातील अनेक दिवाळी अंकातून आपल्या व्यंगचित्र च्या माध्यमातून हजारोना परिचित होता .शांत ,सुस्वभावी, विनोदी असा हा अधिकारी शासकीय सेवेत तर प्रिय होताच पण पत्रकार क्षेत्रात देखील सगळ्यांना जवळचा होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती,सुरवातीला हडपसर परिसरातील खाजगी रुग्णलायत उपचार घेतल्यानंतर आठ दिवसापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ससून मध्ये उपचार सुरू होते .दरम्यान शनिवारी पहाटे त्यांचा कोरोनाशी लढा अखेर संपला .पुण्यासारख्या शहरात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला .

Exit mobile version