Site icon लोकाशा-बंब न्यूज

वडिलांच्या कर्जबाजारीपणाला कंठाळून मुलाने केली आत्महत्या


केज, दि. 31 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील शेतकरी अमोल अनंत राऊत (वय 32 वर्षे) यांनी आपल्या वडीलाच्या कर्जबाजारीपणाच्या नैरास्यातून बुधवारी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बर्‍याच दिवसांपासून वडिलाच्या कर्जबाजारीपणा बद्दल कुटूंबियात चर्चा होत होती. त्याच्यामुळे आलेल्या नैराश्यातून अमोल अनंत राऊत वय 32 वर्षे याने बुधवारी सर्व्हे नं.10/4 मधील हुरा नावाच्या शेतातील लिंबाच्या झाडा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात थकलेले आई,वडील, पत्नी,2 मुली,1 मुलगा असा परिवार असून घरातील कर्ता गेल्यामुळे राऊत कुटुंब उघड्यावर पडले आहे.
Exit mobile version