केज, दि. 30 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील जानेगाव येथे गुरुवार दि (25)रोजी रात्री आशा अनिल चटप वय (38) वर्ष यांचा दगडाने ठेचून खून झाला होता. घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. युसूफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता.
घटनेनंतर अप्पर पोलीस स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत,युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे सपोनि विजय आटोळे यांनी भेट देऊन उस्मानाबाद येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. युसूफवडगाव ठाण्याचे सपोनि विजय आटोळे यांनी चार दिवसात खुनाच्या तपासाचे चक्र गतीने फिरवले सदरील घटनेत शेतीच्या वादाच्या कारणावरून पती अनिल चटप याने पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे .सोमवार रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरुवार रोजी रात्री साडेसात च्या सुमारास गावाशेजारील सटवाई नामक शेतात घटनेनंतर अप्पर पोलीस स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत,युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे सपोनि विजय आटोळे यांनी भेट देऊन उस्मानाबाद येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.अंबाजोगाई येथील स्व रा ती रुग्णालयात प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यादिवशी महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.विविध प्रकारे चौकशी वरून तपास करून पती अनिल चटप आरोपीविरुद्ध कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल करून खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासी अधिकारी सपोनि विजय आटोळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत ,सपोनि दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.