बीड : श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती हभप.लक्ष्मण महाराज रामगडकर यांना मंगळवारी देवाज्ञा झाली, रामगडावर होणार्या रामनवमी उत्सवानिमित्त अनेकदा त्यांचे पुण्याशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले, आपली अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासत प्रबोधनातुन समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्कार्य त्यांनी केले. त्यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असल्याच्या शोकभावना खा. प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त करून हभप.लक्ष्मण महाराज रामगडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हभप लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने रामगड पोरका झाला – खा. प्रीतमताई
