Site icon लोकाशा-बंब न्यूज

आम्हाला लॉकडाऊन नकोय म्हणत गढीच्या शेतकऱ्यांनी भरविला बाजार

गढी :- वाढते कोरोणा संक्रमण रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी बीड यांनी घोषित केलेल्या 10 दिवसाच्या लॉकडाऊन लोकांना काही केल्या मान्य होईना. लॉक डाऊन चा निर्णय जाहीर झाल्यापासून सर्वच क्षेत्रातून याला विरोध करण्यात आला. आणि लोकांच्या या आक्रमक भूमिका पुढे प्रशासनाने नमते घेत लॉक डाऊन 30 मार्च नंतर हळू हळू शिथिल करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतू काही व्यावसायिकांनी होळी धुली वंदन सणासाठी खरेदी केलेले साहित्य बाजार बंद असल्यामुळे घरातच पडून रहात आहे. आणि याचा सर्वात जास्त फटका लहान दुकानदारांना जे हातावर पोट भरतात यांना बसत आहे. त्यामुळे कोरोनची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासन कडक नियम न लावता लॉक डाऊन करुन सर्वसामान्यांची घरे उद्वस्त करत आहेत अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेकडून येत आहेत. जर प्रशासन लॉक डाऊन खोलनार नसेल तर आम्ही कोणताही नियम न पाळता बाजार पुढे पण सुरु ठेऊ मग सरकारनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल पण आम्हाला लॉक डाऊन नकोय असे व्यापारी व शेतकरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

चौकट
अन् शेतकऱ्याच्या डोळयात पाणी
लोकांच्या दारात माल घेऊन गेल्यास साहेब लॉक डाऊन मुळे 40 रू किलोचा कांदा तीन रूपये किलो विकतोय, पंधरा रूपये किलोचा बटाटा रुपया किलो विकत आहोत वांगी टमाटो तर फुकट भाव द्यावी लागत आहे तरी पण सुक्षित लोक आमची थट्टा करत यामधे पण भाव कमी करण्यास बोलतात. बाजार बंद असल्यामुळे आम्हाला लोकांच्या दारात भाजीपाला घेउन जावे लागते . भर उन्हात तळपत फिरावे लागतेय तरी पण एक किलो तेल पुढा घेण्या पुरते पण पैसे येत नाहीत तर सांगा ना साहेब जगु कसे त्या कोरोना पेक्षा आमच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मरण्याची वेळ आलीय .

-धोंडीराम पवार, शेतकरी

Exit mobile version