Site icon लोकाशा-बंब न्यूज

अमोल येडगे आता यवतमाळचे जिल्हाधिकारी


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेचे तात्कालिन सीईओ अमोल येडगे यांची पदोन्नती झाली आहे. त्यानुसार आता त्यांच्याकडे राज्य शासनाने यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. सध्या ते अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत असून ते लवकरच यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांचा पदभार स्विकारणार आहेत.
शुक्रवारी राज्य शासनाने पाच आयएएस अधिकार्‍यांना नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे तात्कालिन सीईओ अमोल येडगे यांना यवतमाळ याठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या यवतमाळ येथे बीडचे तात्कालिन जिल्हाधिकारी देवेंदर सिंह हे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सिंह यांची बदली नेमकी कुठे झाली याचा आदेश रात्री उशीरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता, दरम्यान अमोल येडगे यांनी बीड जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे काम केले होते, अगदी याप्रमाणेच येडगे यवतमाळ या ठिकाणीही आपले चोखपणे कर्तव्य बजावतील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version